Monday , December 8 2025
Breaking News

आयुष्मान योजनेमध्ये कागल विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात नंबर वन असेल : मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

Spread the love

 

कागलमध्ये आयुष्यमान भव योजनेचा प्रारंभ

कागल (प्रतिनिधी) : आयुष्मान योजनेमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात नंबर वन असेल, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागलमध्ये आयुष्मान भव योजनेचा प्रारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघांमध्ये सबंध महाराष्ट्रात उच्चांकी झाले आहे. उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या. वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आयुष्मान भव योजनेअंतर्गत…. आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान भारत योजना कार्डची नोंदणी व वितरण, स्वच्छता अभियान, आयुष्मान सभा, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी आदी उपक्रम विशेष मोहीम म्हणून प्रभावीपणे राबवा.
कार्यक्रमात आयुष्मान भव योजनेच्या ओळखपत्रांचे प्रातिनिधीक स्वरूपात नागरिकांना वितरण झाले. टी.बी. निक्ष्यमित्र म्हणून क्षयरोग झालेल्या रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषणयुक्त मासिक आहाराचे पॅकेज देणाऱ्या डाॅ. मंगल ऐनापुरे व पेठवडगाव येथील राहोबत सेवाभावी संस्था यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते झाला.
व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष नवल बोते, आरोग्य सेवा संचालक डाॅ. प्रेमानंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पवार, डॉ. उमेश डॉ. सावंत, डाॅ. बामणीकर, डाॅ. गांधी आदी उपस्थित होते.
स्वागत तालुका वैद्यकीय अधिकारी फारुख देसाई यांनी केले . प्रास्ताविक आरोग्यसेवा संचालक डाॅ. प्रेमानंद कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ. नासिर नाईक यांनी केले. आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *