कागल (प्रतिनिधी) : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आशिर्वादाने व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई यांचा सन २०१-२२ चा पुणे विभागातील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणून विशेष पुरस्कार नाशिक येथे शानदार सोहळ्यात प्रदान केला.
माजी रेल्वेमंत्री भारत सरकार तथा चेअरमन न्यू ड्राफ्ट पॉलिसी सहकार मंत्रालय भारत सरकार सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला. राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, ज्येष्ठ संचालक राजेंद्र जाधव, आप्पासाहेब हूच्चे, रणजीत पाटील, रवींद्र घोरपडे, उमेश सावंत, बाबासाहेब मगदूम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण, व्यवस्थापक हरिष भोसले यांनी हा पुरस्कार स्विकारला.
कागल जहागीरीचे अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जन्मदिनी ही बँक स्थापन झाली आहे. स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आशिर्वादाने व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजे बँक सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचे प्रतिक बनली आहे. व्यवसायाची सन २०२२–२३ मध्ये रू. एक हजार कोटीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे बँकेस या आर्थिक वर्षांमध्ये नवीन पाच शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. बँकेच्या २०२३ अखेर एकूण ठेवी ४६४ कोटी झाल्या आहेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी चिकाटीने वसुली केलेने बँकेने निव्वळ एन. पी. ए. शुन्य टक्के राखन्यात सातत्य ठेवले आहे.