अध्यक्ष एम. पी. पाटील यांची माहिती
कागल (प्रतिनिधी) : येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील नफ्यातुन १५% लाभांश जाहीर केला होता. ती सभासदांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली.
शतकमोहत्सवी वर्षात २५% व दरवर्षी प्रमाणे सतत १५% लाभांश देणारी राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँक ही एकमेव बँक आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे. राजे समरजितसिंह घाटगे यांचे मार्गदर्शन व सक्षम नेतृत्वाखाली दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत रु. १०० कोटी कर्ज वाटपाचा टप्पा पूर्ण करुन राज्यात आदर्श निर्माण केला आहे. बँकेकडून आज अखेर सर्वाधिक १२०० युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी दिली आहे.अशीही माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली.
भाग भांडवल ५ कोटी ३ लाख इतके आहे. बँकेचा एकूण निधी ४२ कोटी ६५ लाख इतका असुन ठेवी ४६४ कोटी कर्जे, २६६ कोटी ८ लाख, गुंतवणुक २१४ कोटी ४ लाख, कोटी आहेत. बँकेस २ कोटी ७२ लाखाचा नफा झाला आहे. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेवून निव्वळ एन.पी.ए. शुन्य टक्के राखन्यात यश मिळविले आहे. सालाबादप्रमाणे बँकेस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे, अशीही माहिती पाटील यांनी दिली.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर संचालक राजेंद्र जाधव आप्पासो हुच्चे, अप्पासाहेब भोसले, प्रकाश पाटील, रविंद्र घोरपडे, रणजित पाटील, उमेश सावंत, संचालिका सौ. कल्पना घाटगे, तज्ञ संचालक अनिल मोरे, ऑड. बाबासाहेब मगदूम मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण आणि बँकेचे प्रशासन अधिकारी, हरिदास भोसले व कर्मचारी उपस्थित होते.