Tuesday , March 3 2026
Breaking News

शववाहिकेचा गुटख्याच्या अवैध वाहतूकीसाठी वापर

Spread the love

 

कागलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस : ४ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त
कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव- पंचताराकित एमआयडीसी रोडवर संशयितरित्या शववाहिका आढळून आली. शववाहिकेची तपासणी केली असता यात अवैधरीत्या गुटखा वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. या शववाहिकेवर कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीस्तव वाहतूक करताना मिळून आला. त्यांच्याकडून ४ लाख ७८ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनिल संजय भालेराव व सनी बाबासाहेब ठमके (रा.वडणगे ता . करवीर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी शववाहिकेसह दोघांना चौकशीकरिता ताब्यात घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात आणले. यावेळी कर्नाटकातून वडणगेत विक्रीसाठी गुटखा नेला जात असल्याचे उघडकीस आले. ही शववाहिका गावातील एका तरूण मंडळाची आहे. भालेकर याने एका नातेवाईकाचे शव बाहेरगावी पोहचविण्यासाठी मंडळाकडून ही शववाहिका घेतली होती. यातून गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक केल्याचे उघडकीस आले. कागल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *