उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांची माहिती
कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची सन 2023-24 या चालू गळीत हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरक्कमी एफआरपी रू. 3100/- (तीन हजार शंभर) जाहीर करणे येत आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, सदर एफआरपी ची रक्कम विनाकपात एकर कमी देण्यात येणार असून हंगाम समाप्ती नंतर महसूल विभाग तपासणी नुसार (आर. एफ. एस) जो दर निघेल तो दर देनेस कारखाना कटिबद्ध आहे.
यावेळी गळीत हंगामाचा कालावधी कमी असलेली सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उद्दिष्ट पूर्ततेसाठी आपला पिकवलेला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक युवराज पाटील, बॉबी माने, सचिन मगदूम, सुनील मगदूम, राजू पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.