राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाचे उद्घाटन
कागल (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक गुणवत्तेला प्रोत्साहन मिळणार आहे. या महोत्सवातून राज्याला दिशा देण्याचे काम कागलकर करतील, असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.
येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलच्या मैदानावर राजे फाउंडेशन व जिजाऊ समितीच्या माध्यमातून आयोजित राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते.
शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी या महोत्सवाचे उदघाटन केले.
घाटगे पुढे म्हणाले, कागलची राजकीय विद्यापीठ अशी ओळख भुषणावह नाही. ती बदलावी अशी स्व. राजे साहेबांची इच्छा होती. लोकरंग महोत्सवाच्या माध्यमातून शाहूंची जन्मभुमी असलेल्या कागलची सांस्कृतिक विद्यापीठ अशी ओळख निर्माण होईल.
यावेळी सुहासिनीदेवी घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सौ.नंदितादेवी घाटगे, विरेंद्रसिंहराजे घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, गोकुळचे माजी चेअरमन रणजीत पाटील, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, रमेश माळी बाबगोंडा पाटील, सुनिल सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
स्वागत श्रेयादेवी घाटगे यांनी केले. आभार शाहूचे संचालक सचिन मगदूम यांनी मानले.
——————————————————————
लोकरंग महोत्सवास शुभेच्छा देण्यासाठी मलेशियातून कागलमध्ये
सद्या मलेशिया देशात वास्तव्यास असलेल्या एसडीआर फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमा इंग्रोळे या सीएनजी गॅस प्रोजेक्टच्या उद्योजिका या लोकरंग महोत्सवासाठी शुभेच्छा देण्यासाठी कागलमध्ये दाखल झाल्या. त्यांनी उद्घाटन कार्यक्रमावेळी श्रीमती घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे यांचा या आगळ्य-वेगळ्या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.