Sunday , September 8 2024
Breaking News

अवैद्य दारू निर्मिती अड्ड्यावर छापा; तब्बल ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बेकायदेशी देशी, विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य, मद्यसाठा आणि इतर साहित्य असे एकूण ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोल्हापूर शहरापासून जवळच असणाऱ्या गोकुळशिरगाव येथील एका शेडमध्ये ही अवैद्य दारू भट्टी सुरू होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच अवैद्य दारू निर्मितीची मोठे रॅकेटच कार्यरत असल्याचे यावरून दिसून येत असून यामध्ये दोघांना रंगेहात पकडले असून आणखी काही लोक यात सहभागी असल्याची शक्यता आहे.

या कारवाईत आरोपी रोहित रूपसिंग तमायचे (वय 31 रा.गोकुळशिरगाव, ता. करवीर जि. कोल्हापूर), मनोज सुरेश घमंडे (वय 35 रा.गोकुळशिरगाव, ता. करवीर जि. कोल्हापूर) यांना रंगेहात पकडले असून त्यांना अटक केली आहे. तर आरोपी राजु (संशयित) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असुन आणखी काही इसम सहभागी असल्याची शक्यता आहे. त्याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उचगाव (ता. करवीर, जि.कोल्हापूर) गावच्या हद्दीत मणेरमळा येथील एका बंधिस्त पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदा अवैध बनावट देशी व विदेशी मद्य निर्मीती करतात अशी गुप्त बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले असून मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी मद्य तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट, अर्क, स्वाद, विविध ब्रँडच्या नावाची लेबले, बुचे, बाटल्या, बॉक्स तसेच बाटल्या सिलिंग करण्यासाठी लागणारे मशिन, मद्याची तिव्रता मोजण्यासाठी लागणारे उपकरण असे सर्व साहित्य जप्त केले आहे. त्याचप्रमाणे सदर ठिकाणी नामवंत मद्याच्या बॅंण्डची बनावटरित्या तयार केलेले सुमारे 19 बॉक्स, पाच प्लॅस्टीकचे कॅन, विदेशी दारूसाठा असा एकूण 41 लाख 4 हजार 058 इतका मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांचीही चौकशी केली असता, शेडमध्ये आपण अवैद्यरित्या बनावट विदेशी मद्य आपण संगनमताने तयार करत असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यांना जागीच अटक केली आहे.

सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर उपअधीक्षक राजाराम खोत, कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, निरीक्षक जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, विजय नाईक, बबन पाटील, जवान सर्वश्री सचिन काळेल, सागर शिंदे, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, सचिन लोंढे, जय शिनगारे, राहुल संकपाळ, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे असे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love    सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात फरार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *