Tuesday , March 3 2026
Breaking News

कोल्हापूर मनपाला जाग; अनाधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात

Spread the love

 

कोल्हापूर : मुंबईच्या घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेला अखेर जाग आली आहे. कोल्हापूर शहरात अनाधिकृतपणे लावलेले होर्डिंग काढण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केलं आहे. मुंबईतील दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेनं विनापरवाना उभा केलेलं होर्डिंगच्या मालकांना नोटीस पाठवण्यात आलं आहे.

20 ते 25 अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले
कोल्हापूर शहरातील 20 ते 25 अनाधिकृत होर्डिंग काढण्यात आले आहेत. काही होर्डिंग स्वतः मालकांनी काढून घेतले, तर काही होर्डिंग कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढले आहेत. मात्र, यामुळे कोल्हापूर शहरात किती अनाधिकृत होर्डिंग लावली होती याचा अंदाज येत आहे. मात्र, घाटकोपरमधील घटनेनंतर उशिरा का असेना कोल्हापूर महानगरपालिकेला शहाणपण सुचलं अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *