नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग चिंतेत होते. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनो महामारीशी लढण्यासाठी विकसीत करण्यात आलल्या लसीमुळे दिलासा मिळाला. कोरोनापासून बचावर करण्यासाठी लाखो लोकांनी कोरोनालसीकरण करुन घेतले. मात्र, आता जवपास 3 वर्षानंतर कोरोना लसीबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. कोव्हिशिल्डनंतर आता कोवॅक्सिन या लसीचे साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर आले आहेत.
मागील काही दिवसांपासून कोव्हिशिल्ड लस चर्चेत आहे. कोव्हिशिल्ड लसीचे दुष्परिणाम समोर आले. ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या कोरोना लसी बाजारात उपलब्ध आहेत. जगभरात लाखो लोकांनी या लसी घेतल्या आहेत. मात्र, या लसीचे दुष्परिणाम होत असल्याचा दावा करत ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने ॲस्ट्राझेनेका कंपनीविरोधात कोर्टात केस दाखल केली. ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर मेंदूला हानी पोहोचल्याच या व्यक्तीने कोर्टात नमूद केलेल्या याचिकेत म्हंटले आहे. या व्यक्तीसह अनेकांनी या लसीचे दुष्परिणाम झाल्याची तक्रार केली आहे. यूके उच्च न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला.
ॲस्ट्राझेनेका कंपनीने या लसीचे काही प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याची कबूली कायदेशीर प्रकरणात दिली आहे. अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) होऊ शकतो. यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो असा खुलासा कंपनीने केला आहे.
कोवॅक्सिनचे नेमके काय साइड इफेक्ट्स होणार
कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर आले आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे होणारे दुष्परिणाम संशोधकांनी शोधून काढले आहेत. या संदर्भातील अहवाल स्प्रिंगरलिंकवर प्रकाशित करण्यात आला आहे. महिला आणि किशोरवयीन मुलांमध्ये या लशीच्या दुष्परिणामांबाबत सर्वेक्षण करण्यात आले. 1,024 लोकांचा या सर्वेक्षमात समावेश करण्यात आला होता. लस घेतलेल्या 635 किशोरवयीन आणि 291 प्रौढ व्यक्तींना प्रकृतीची माहिती या सर्वेक्षणात घेण्यात आली. कोवॅक्सिन लस घेतलेल्यांना एईएसआय या दुर्मिळ प्रकारच्या एलर्जीसारखी लक्षणं जाणवली आहेत.