Wednesday , March 4 2026
Breaking News

कोल्हापूरच्या सायबर चौकात भरधाव कारने दुचाकींना उडवले; तिघांचा मृत्यू

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापुरातील सायबर चौकात झालेल्या एका भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका कारने चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळं धडक दिलेल्या दुचाकी उडून इतर दुचाकींना धडकल्या त्यावरील लोकही ‘कॅरम बोर्ड’ फोडल्याप्रमाणं उडाली. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापुरातील सायबर चौकात हा भीषण अपघात झाला आहे. नेहमीप्रमाणे या चौकात वाहतूक सुरु असताना अचानक एक भरधाव कारने राजारामपुरीकडून येताना बरोबर चौकामध्येच एकमेकांना क्रॉस होणाऱ्या काही दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कॅरम बोर्डवरील सोंगट्या स्टायकरनं फोडल्यानंतर ज्या पद्धतीनं कॅरम फुटतो तशी दुचाकीवरील लोक उडाले. या धडकेची तीव्रता सांगताना पहिल्यांदा ज्या दुचाकीस्वारांना धडक बसली त्यावरील लोक दुसऱ्या दुचाकीवर जाऊन धडकले, अशा प्रकारची ही दृश्ये पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय. यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सीपीआर आणि सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *