कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याव पंचगंगा नदी 29 फुटांवरून वाहत आहे.
पावसाचा जोर असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुळे धोकादायक मार्गांवरून वाहतूक करू नये, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
वेसरफ लघू पाटबंधारे तलाव भरला
दरम्यान, आज (7 जुलै) सकाळी गगनबावडा तालुक्यातील वेसरफ तलाव 100 टक्के भरला. प्रकल्पाच्या सांडव्यावरून 125 क्यूसेक्स इतका विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या तलाव परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, चंदगड तालुक्यात घटप्रभा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर जांबरे धरणही पूर्ण क्षमतेनं भरले आहे. या धरणाची क्षमता 0.820 टीएमसी आहे.
जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली?
पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
वारणा नदी- चिंचोली, माणगांव
भोगावती नदी- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे,
कासारी नदी- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे,
घटप्रभा नदी- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी
हिरण्यकेशी नदी – साळगांव,
ताम्रपर्णी नदी- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर, माणगाव, न्हावेली
दुधगंगा नदी- दत्तवाड असे 28 बंधारे पाण्याखाली आहेत.