Wednesday , March 4 2026
Breaking News

शिवभक्तांच्या आग्रहाखातर १३ ऐवजी १४ जुलै रोजी विशाळगड मुक्ती मोहीम : संभाजी राजे यांची माहिती

Spread the love

 

कोल्हापूर : संभाजी राजे गेल्या दीड वर्षांपासून किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर लढा देत आहेत. मात्र या दीड वर्षांत प्रशासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने संभाजी राजे यांनी दि. ०७ जुलै रोजी कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमण मुक्तीबाबत पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात शिवभक्तांची बैठक बोलवली होती.

१३ जुलै १६६० रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाचा वेढा भेदून विशाळगडावर पोहचले होते. त्यामुळे याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून १३ जुलै २०२४ रोजी हजारो शिवभक्तांसह किल्ले विशाळगडावर जाऊन अतिक्रमण हटविण्याचा निर्धार केला होता. या मोहिमेस असंख्य शिवभक्तांचा प्रतिसाद लाभत असून शनिवार ऐवजी रविवारी ही मोहीम आयोजित करावी अशी मागणी राज्यभरातील अनेक शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. शिवभक्तांच्या या मागणीचा विचार करून संभाजी राजे यांनी १३ जुलै ऐवजी रविवार, दि. १४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *