Thursday , April 10 2025
Breaking News

खा. धैर्यशील माने – राहुल आवाडे यांच्या ड्रॉयव्हरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Spread the love

 

इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील नाट्यगृह परिसरात पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार धैर्यशील माने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाहनचालकांची चारचाकी गाडी लावण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. यादरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ हेही पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी इचलकरंजी दौर्‍यावर आले होते. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला.

नेमकं प्रकरण काय?
यावेळी दोन्ही चालकांमध्ये अक्षरशः एकमेकांच्या अंगावरील कपडे फाडण्यापर्यंत हाणामारी झाल्याने या हाणामारीची चर्चा दिवसभर शहरात रंगली होती. त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्ती करीत हा प्रकार थांबविला. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर याची दखल राज्यातील दूरचित्रवाहिन्यांनी घेतल्यामुळे राज्यभर हा विषय चर्चेत होता.

About Belgaum Varta

Check Also

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत बाळूमामांचे दर्शन

Spread the love  कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *