
मुंबई : दि. ९ जुलै २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा. ना राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणाचे नियमन या अत्यंत संवेदनशील विषयावर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
बैठकीस माझ्या समवेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, विविध विभागांचे मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
“महापुराच्या छायेत दरवर्षी जगणाऱ्या जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन ही केवळ तांत्रिक बाब नाही, तर कोल्हापूर-सांगलीच्या लाखो जनतेच्या जीवनाशी निगडीत आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढवण्यास माझा स्पष्ट विरोध!” असे स्पष्ट मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर-सांगलीसाठी ही बैठक दिशादर्शक ठरणार असून भविष्यातील धोके ओळखून तत्काळ उपाययोजना करण्याची विनंती केली.

Belgaum Varta Belgaum Varta