
कोल्हापूर : अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आले आहे, माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचे आश्वासन वनताराकडून देण्यात आले आहे. वनताराचे सीईओ विहान करणी यांची आज नांदणी मठाच्या महंतांसबोत बैठक पार पडली, या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी माधुरी हत्तीणीला परत कोल्हापूरला आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नांदणी परिसरात माधुरीसाठी घर बांधणार असून, याच परिसरात माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करणार असल्याचे देखील विहान करणी यांनी म्हटले आहे.
हा मुद्दा प्रतिष्ठेचा नाही तर हा मुद्दा माधुरीच्या जीवासंदर्भात आहे. यामध्ये हारण्याचा किंवा जिंकण्याचा प्रश्न नाही. यामध्ये माधुरीचा विजयच आहे. कारण वनतारामध्ये देखील तिला चांगले घर मिळाले होते आणि इथे नांदणी मठात देखील तिला चांगले घर मिळणार आहे, त्यामुळे माधुरीचा विजयच झाला आहे, आम्ही प्राणी वेअफेअरच्या बाजूने उभे आहोत, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या माधुरी लवकरात लवकर कोल्हापुरात येईल, असे विहान करणी यांनी म्हटले आहे.
महंतांची प्रतिक्रिया
नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार आणि वनतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे. नांदणी मठाच्या मालकिच्या जागेमध्ये हत्तीच्या पालपोलषणाची सुविधान केंद्र उभारणार असल्याचं वनतारा व्यवस्थापनाने मान्य केलं आहे, असं नांदणी मठाच्या महतांनी म्हटले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta