Tuesday , December 9 2025
Breaking News

इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा डोक्यात दगड घालून खून

Spread the love


इचलकरंजी : शहरातील वखार भाग येथे उदय मधुकर गवळी (वय 40, रा. रेणुका नगर झोपडपट्टी) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्जनस्थळी डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र कौटुंबिक कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
वखार भाग येथे मोहन मोहन आर्केडच्या पाठीमागे पडीक जागा आहे. या ठिकाणी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह आढळून आला. तातडीने शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डोक्यात दगड घालून हा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे. दगडाच्या घावाने डोके जमिनीत खोलवर रुतल्याचे दिसून येत होते.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बी. बी. महामुनी दाखल झाले. मृत व्यक्ती हा रेकॉर्डवरील गुन्हेगार उदय गवळी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आजीला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आठवडाभरापूर्वी गुन्हा दाखल होता.

About Belgaum Varta

Check Also

….तर अधिवेशन काळात कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

Spread the love  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *