Tuesday , March 3 2026
Breaking News

कोल्हापूरात ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; हाताच्या नस कापल्या अन्…

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापुरात सहा नृत्यांगणांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हाताच्या नसा कापून घेत त्यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर त्यांना तातडीने सीपीआर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सहा नृत्यांगणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या अधिक तपास सुरू आहे.

सहा नृत्यांगणा या कोल्हापुरात वास्तव्यास होत्या. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी काही गुन्ह्यांखाली सहा नृत्यांगणांवर कारवाई केली होती. तसेच त्यांना ताब्यात घेतलं होतं. कोल्हापूर पोलिसांकडून सहा नृत्यांगणांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. मात्र, आज सहा नृत्यांगणांनी मिळून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

या घटनेनंतर पोलिसांनी याची माहिती देण्यात आली. सध्या अधिक तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *