
युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी १०६ व महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्यात ८५ जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. गेली ६९ वर्षे सीमाप्रश्न भिजत पडला आहे. गेली अनेक वर्षे कर्नाटक सरकार कडून सीमाभागातील मराठी भाषिकबांधवांवर भाषिक संस्कृतीक दडपशाही सुरू आहे. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांच्या लढ्याला पाठबळ देणाऱ्या महाराष्ट्रातील मंत्री लोकप्रतीनिधींवर कर्नाटक सरकार असंविधानिक पद्धतीने कर्नाटक राज्यात प्रवेश बंदी केली जात आहे. कर्नाटक सरकारच्या या असंविधानिक कृतीला प्रत्युत्तर म्हणून सीमाप्रश्नाचा न्यायालयीन निकाल लागेपर्यंत कर्नाटकातील मंत्री व लोकप्रतीनीधींनाही महाराष्ट्रात प्रवेशबंदी घालण्यात यावी, अशी मागणी युवा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश खोंद्रे यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदनाने केली आहे.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या न्यायासाठी २००४ साली न्याय्यालयात दावा दाखल केला आहे. त्याची सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी सुरु होत आहे. तसेच कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर २०२५ पासून बेळगांव येथे सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमावासियांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्यातून मराठी भाषिकांना त्यांच्या सीमाप्रश्नाबाबतच्या भावना मांडण्यांस आडकाठी आणू नये. यासाठी मेळाव्याची रीतसर परवानगी ही मागितली आहे. मात्र ही परवानगी विचारात न घेता या मेळाव्यासाठी बेळगांवात येणाऱ्या महाराष्ट्रातील मंत्री खासदार आमदार व लोकप्रतिनिधींना कर्नाटकात असंविधानीक प्रवेशबंदी करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सरकारनेही सिमाप्रश्नाचा न्याय्यालयीन निकाल लागेपर्यंत कर्नाटकातील मंत्री व लोक प्रतिनिधींनाही महाराष्ट्र राज्यात प्रवेशबंदी करावी व तसे कर्नाटक सरकारला कळवण्याची खबरदारी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्विकारले. यावेळी विनोद महापूरे, मंदार गुरव, ऋषीकेश दिंडे, सिध्दार्थ वाळवेकर, दिग्वीजय निंबाळकर, भिकाजी मोहीते, आदींसह युवासैनिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta