Tuesday , March 3 2026
Breaking News

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ उदय आणि अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राधानगरीतील जंगलात दोघांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार आणि त्याची प्रेयसी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांनी जंगलात आत्महत्या केल्याचा गावातल्या पोलीस पाटलांना कळाले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. त्यानंतर दोघांवर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओंकारचे नातेवाईकांच्या माहितीनुसार, तो कष्टाळू आणि मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा होता. त्याच्याकडे कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर होता. गावातील यात्रेत त्याचा विशेष सहभाग असायचा. त्याने टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूरच्या तरसंबळे जंगलात दोघांनी आत्महत्या केली. ओंकारचे वय हे २८ होते. तर त्याच्या प्रेयसीचे वय १७ होते. दोघे एकाच दोरीने बांधले गेले होते. दोघांनी चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  कोल्हापूर : जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज किंवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *