कोल्हापूर : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी सकाळी पोकलॅडची चाचणी यशस्वी झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या परवानगी नंतर अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार असून, दोन तासात वाहतूक सुरू होईल असा विश्वास सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे दीड फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे पाच ते सहा फूट पाणी आहे. सकाळी भोसले यांनी पोकलॅडमधून रस्त्याची चाचणी केली व पुराच्या पाण्याने फुटलेले दुभाजक बाजूला केले. वाहतुक सुरू करताना सुरवातीला पाण्याचा टँकर सोडण्यात येईल आणि त्यानंतर पाणी, पेट्रोल, डिझेल व दूध ही अत्यावश्यक सेवेतील वाहणे सोडण्यात येणार आहेत.
वाहतूक सर्वप्रथम एकेरी सुरू होईल. कोल्हापूरहून पुणेच्या दिशेने जाणार्या मार्गावर अजून तीन साडेतीन फूट पाणी आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे.