Saturday , October 19 2024
Breaking News

स्वर-संजीवनातून पंडित संजीव अभ्यंकर यांचे शाहू महाराजांना अभिवादन

Spread the love

शास्त्रीय आणि भक्ती संगीतात श्रोते तल्लीन होऊन भान हरपले
कोल्हापूर (जि.मा.का.) : शाहू मिल येथे पंडित संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायनानाचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. पंडित अभ्यंकराचे शास्त्रीय आणि भक्ती संगीत श्रोत्यांसाठी मेजवानी ठरले. पंडितजींच्या गायनाचा आस्वाद घेताना श्रोते तल्लीन होऊन भान हरपले. निमित्त होते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त शाहू मिलमध्ये आयोजित संगीत दरबार कार्यक्रमाचे.
शाहू मिल येथे आज पंडित संजीव अभ्यंकर यांचा शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्वर-संजीवन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पंडित संजीव अंभ्यकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाला.
पंडित संजीव अंभ्यकर यांना शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायन प्रसंगी अजिंक्य जोशी यांनी तबला, अभिनय रवंदे यांनी संवादिनी, उद्धव कुंभार यांनी तालवाद्य आणि साईप्रसाद पांचाल यांनी स्वरसाथ दिली.
गायनाने आत्मरंजनासह लोकरंजनही होऊन ताल, सुरांच्या लयीत आयुष्य समृद्ध होते, असे सांगून पंडित अभ्यंकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी कलेला राजाश्रय व लोकाश्रय मिळवून दिला. यामुळे या कलानगरीतून अनेक कलाकार उदयास आले. शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या नगरीत गायनाची संधी मिळाली हा सन्मानच आहे,अशी भावनाही पंडित संजीव अभ्यंकर यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, शाहू महाराजांनी कलेला राजाश्रय व लोकाश्रय मिळवून दिल्याने कोल्हापूरही कलानगरी म्हणून नावारुपाला आली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने शाहू राजांचे कार्य आणि विचार आजच्या पिढी समोर आणण्याचा प्रयत्न आहे. संगित दरबार कार्यक्रमामध्ये स्वर-संजीवन कार्यक्रम सादर केल्याबद्दल पंडित संजीव अभ्यंकर यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते पंडित संजीव अभ्यंकर, अजिंक्य जोशी, अभिनय रवंदे, उद्धव कुंभारआणि साईप्रसाद पांचाल यांचा सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

भाजपकडून छत्रपती शिवरायांच्या विचारांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

Spread the love  कोल्हापुरात राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोल्हापूर : हिंदुस्थानात दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *