कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापुरातील डायमंड हॉस्पीटल येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गुरूवारी मध्यरात्री छातीत सौम्य वेदना होऊ लागल्याने त्यांना तत्काळ डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी त्यांच्यावर अँजिओग्राफी तपासणी केली असता एक शीर ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. साईप्रसाद यांच्या देखरेखीखाली क्षीरसागर यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे रूग्णालयातून सांगण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: संपर्क साधून क्षीरसागर यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यासह शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, आमदार दिवाकर रावते यांनीही संपर्क साधून क्षीरसागर यांची विचारपूस केली.
दरम्यान, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सातत्याने गेले तीन -चार दिवस होणाऱ्या बैठका, छत्रपती ताराराणी चौक येथील आंदोलन आणि सातत्याने नियोजन मंडळाच्या होणाऱ्या बैठका यामुळे झालेला कामाचा अतिरिक्त ताण क्षीरसागर यांना जाणवत होता. दरम्यान त्याच्या छातीत सौम्य वेदना होऊ लागल्याने त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.
Check Also
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
Spread the love जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …