Saturday , July 13 2024
Breaking News

कोल्हापूरजवळ भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार, तिघे जखमी

Spread the love

कोल्हापूर : मित्रांसमवेत पार्टी करून कोल्हापूरकडे परतणाऱ्या तरुणांच्या मोटारीला कोल्हापूर जवळील पुईखडी घाटात भीषण अपघात होऊन दोन तरुण जागीच ठार झाले तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. शुभम हेमंत सोनार (24 राहणार राजारामपुरी) आणि शंतनु शिरीष कुलकर्णी (वय 28 राहणार मोरेवाडी तालुका करवीर) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
सौरभ रवींद्र कणसे (वय 26 राहणार पिंपळेश्वर गणपती मंदिराजवळ राजारामपुरी) कोल्हापूर संकेत बाळकृष्ण कडणे (21 राहणार खाडिलकर गल्ली सांगली) याच्यासह आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पंचगंगा नदी मोसमात पहिल्यांदाच पात्राबाहेर

Spread the love    कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *