कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर १७.९६ टक्के आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्हा चौथ्या स्तरामध्ये आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार दरम्यान ठराविक वेळेत सुरू असणारे खेळ, चित्रीकरण, दुकाने, व्यायामशाळा, ब्युटी पार्लरस, स्पा, केशकर्तनालय, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, सायकलिंग शनिवार आणि रविवारी बंद राहतील. यासंदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शनिवार व रविवारी या दोन्ही दिवशी अत्यावाश्यक आणि अति तातडीच्या सेवांव्यतिरिक्त इतर सेवा कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
हे बंद राहणार
दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून)
चित्रीकरण, मॉल्स, चित्रपटगृहे
खेळ, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलिंग
धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम, मेळावे
कृषि व कृषिपूरक सेवा
व्यायामशाळा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स
हे सुरू राहणार
वृत्तपत्र छपाई व विक्री
रुग्णालये, औषधे विक्री, निर्मिती
शेतीची कामे, अत्यावश्यक सेवेतील दुकाने
रेस्टॉरंट (फक्त पार्सल व घरपोच सेवा)
लग्नसमारंभ (२५ लोक क्षमतेने)
अंत्ययात्रा (२० उपस्थिती)
बांधकाम (कामगार निवास व्यवस्थेठिकाणीच)
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बस), माल वाहतूक
खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेचा प्रवास