Tuesday , March 3 2026
Breaking News

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

Spread the love

गोंडा : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला जाणार होते. मात्र, त्यांनी ट्विट करून तूर्तास आपण हा दौरा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यानंतर राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला कडाडून विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या 5 जूनच्या अयोध्या दौर्‍याच्या विरोधासाठी शरयू स्नानाच कार्यक्रम आयोजित केला होता. राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असला तरी माझा दौरा आणि 5 जूनचा कार्यक्रम होणारच आहे. आम्ही त्यादिवशी साधू-संतांच्या उपस्थितीत शरयू स्नान करू. आता राज ठाकरे अयोध्येत येणार नसल्याने आम्ही आणखी उत्साहात कार्यक्रम साजरा करू. आम्ही 5 जूनला योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करू, असे बृजभूषण सिंह यांनी सांगितले.
मनसेच्या नेत्यांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने अयोध्येत येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी जवळपास 10 रेल्वेगाड्या बुक केल्या जाणार होत्या. तरीही अयोध्येत मनसेचे किती कार्यकर्ते पोहोचू शकतात, याला एक मर्यादा होती. तर बृजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील एक मोठा वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. अशावेळी बृजभूषण सिंह यांचा विरोध झुगारून अयोध्येत गेल्यास राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निश्चितच नाकारता येत नव्हती. त्यामुळे राज ठाकरे अयोध्येत गेल्यास संघर्षाची शक्यता होती. मात्र, आता राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याने हा संघर्ष तूर्तास टळला आहे.
आम्ही अयोध्या दौर्‍यासाठी राज ठाकरेंना सहकार्य केलं असतं: संजय राऊत
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला स्थगिती मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. इतर पक्षाचे 5 जून रोजी अयोध्येत काही कार्यक्रम होते. मात्र त्यांनी ते कार्यक्रम रद्द केल्याचं मला प्रसारमाध्यमांकडून समजलं आहे. त्यांना काही सहकार्य हवं असतं तर आम्ही ते केलं असतं. कारण अयोध्या आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *