कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सुटल्यात जमा आहे. या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित केले आहे. याची लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. दरम्यान, याबाबत संजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मातोश्री’वरुन अद्याप आपल्याला कोणताही निरोप आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी देता येणार नाही, या अटीवर शिवसेना ठाम असल्याने संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला होता. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे निश्चित करण्यात आले आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. संजय पवार यांना उमेदवारी देऊन संभाजीराजेंना शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta