मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांचे निवासस्थान तसेच त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणांवर आज गुरुवारी ईडीने छापेमारी केली. या कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही देखील पाहून घेऊ’, असा इशारा राऊतांनी दिला आहे.
अनिल परब कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्याप्रकारे ईडीकडून आरोप लावले जात आहेत; त्याहून अधिक गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कुणी हात लावत नाही. आम्ही अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे राऊत यांनी म्हटले आहे.
देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर, अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी
केवळ शिवसेनेला त्रास आणि अडचणीत आणण्यासाठी कारवाया करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मी ईडीकडे अनेक प्रकरणे पाठवली. पण ती फाईल उघडण्याची तसदीही कुणी घेतली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळणं कधीच लागलं नव्हतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta