Friday , November 22 2024
Breaking News

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची खास रणनीती; आमदारांवर शिवसैनिक नजर ठेवणार

Spread the love

मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी एका एका आमदाराचं मत फार महत्वाचं आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून ही मतं मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे एकमेकांवर घोडेबाजाराचा देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशात शिवसेना या निवडणुकीसाठी सतर्कता बाळगत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं खास रणनीती आखली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती अशी असेल
हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांवर शिवसैनिकही नजर ठेवणार आहेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षावर बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांना विश्वास देतील, भाजप कसं राजकारण करतंय हे सांगितलं, आपण कसे जिंकणार हे आमदारांना पटवून देणार आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॅाटेलवर घेऊन जाण्यात येईल.
सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या विविध टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांची फौज हॅाटेलच्या चारही बाजूला असतील. येणा-जाणार्‍या आमदारांवर शिवसेनेचे कार्यकर्ते नजर ठेवतील. सकाळी सर्व आमदारांची स्वाक्षरी एका कागदावर घेतली जाईल. त्यानंतर पुन्हा बसने आमदरांना ट्रायडंट येथे घेऊन येण्यात येईल. मुख्यमंत्री महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत.
या बैठकीला शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित राहतील आणि पुन्हा हॉटेलवर येतील. मराठवाड्याच्या बैठकीला मोजकेच नेते आणि फक्त मराठवाड्यातले सहा आमदार उपस्थित राहतील. सभा संपल्यानंतर मराठवाड्यातले सहा आमदारांना विशेष विमानानं मुंबईत आणण्यात येईल.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *