माणगांव (नरेश पाटील) : दि. 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अलिबाग येथे माणगांवच्या शबनम बानू गुलाम शब्बिर पठाण यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान निवडणूक डेटा ऑपरेटर म्हणून मतदार यादी उत्कृष्ठरित्या केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला सादर सन्मान डॉ. महेंद्र कल्याणकर जिल्हाअधिकारी रायगड तसेच डॉ. अनिल पाटील प्राचार्य जे.एस.एम.कॉलेज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शबनम बानू गुलाम शब्बिर पठाण ह्या माणगांव तालुक्यातील राजीपा उर्दू शाळा वाणी पुरार येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून सेवा बजावत आहेत. त्या एक उत्तम शिक्षिका आहेत तसेच इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्या जिल्ह्यातील प्राथमिक इंग्रजी अभ्यासाचे टॅग प्रशिक्षण रिसोर्स टीचर म्हणून काम पाहतात प्राथमिक बालशिक्षणाबाबत उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पातळीवरील सीसीआरटी प्रणाली उपक्रमात निवड होऊन त्यांचा देशातील काही राज्यात अभ्यास दौरा झाला आहे विशेष म्हणजे यांची एकमेव निवड करण्यात आली होती.
2016 साली सिक्कीम राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय सीसीआरटी उपक्रमात दिलेल्या योगदानाबद्दल सिक्कीमध्ये ही त्यांचा सत्कार करण्यात आला सदर सन्मान झाल्यामुळे त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.