Wednesday , July 24 2024
Breaking News

एकनाथ खडसे- सचिन आहिर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि सचिन आहिर यांचा विधान परिषद निवडणूकीत विजय झाला. पहिल्या फेरीनंतर एकनाथ खडसे यांना 29 तर सचिन आहिर यांना 26 मते मिळाली. विधान परिषदेत विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसे आणि सचिन आहिर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत…

म्हणून सचिन आहिर यांना मंत्रिपद?

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सचिन आहिर यांनी शिवसेनेचा झेंडा घेतला होता. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपल्या बालेकिल्ल्यातून माघार घेतली होती. वरळी मतदारसंघामध्ये सचिन आहिर यांची मोठी पकड आहे. पण आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली होती. त्यामुळेच शिवसेनेने त्यांना आता विधानपरिषदेचं तिकिट देत विधिमंडळात पुनर्वसन केले. त्यातच पुढील काही दिवसांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी त्यांना मंत्रिपद देत वरळीकरांना आकर्षित करण्याचा शिवसेना नक्कीच प्रयत्न असेल. एका कथित प्रकरणामुळे मंत्रिपद गमवावे लागलेले संजय राठोड यांच्याजागी आता त्यांची वर्णी लागू शकते. त्यामुळे लवकरच सचिन आहिर यांना वनमंत्रिपदाची जबाबदारी मिळू शकते.

एकनाथ खडसेंनाही मंत्रिपद मिळणार?

भाजपमधील अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले एकनाथ खडसे यांनाही मंत्रिपद दिले जाऊ शकते. खडसेंचा अनुभव लक्षात घेता भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते. पक्ष सोडल्यापासून एकनाथ खडसे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार सतत आरोप करत असतात. नवाब मलिक यांचे रिक्त मंत्रिपद एकनाथ खडसे यांच्या वाट्याला येऊ शकते. अथवा कृषीमंत्रिपदाची जबाबादारी मिळण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love  नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळाप्रकरणात ईडीने कारवाई करून अटक केलेले दिल्लीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *