मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे देवेंद्र फडणवीस आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशानुसार आता बहुमत चाचणीची गरज नाही. त्यामुळे आजचे विशेष अधिवेशन होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज ३० जून रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते. ज्या प्रयोजनासाठी अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते, ते प्रयोजन आता आवश्यक राहिले नसल्याने राज्यपालांनी हे अधिवेशन संस्थगित केले आहे, असे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी म्हटले आहे.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …