देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : 2019 च्या निवडणुकीत भाजप शिवसेना असे युतीची निवडणूक झाली होती. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या.त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल असे स्पष्टपणे सांगितले होते.मात्र शिवसेना नेत्यांनी हिंदूत्वाला नेहमीच विरोध करणाऱ्यांशी संगणमत करून सत्ता स्थापन केले.
भाजपने हाती घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या विकासकामांना महाविकास आघाडी सरकारने खोडा घातला. महा विकास आघाडीने जनमताचा घोर अपमान केला. महा विकास आघाडीचे दोन मंत्री मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. महा विकास आघाडी सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. राज्यपालांच्या पत्रा नंतरच औरंगाबाद शहराचे नामांतर झाले आहे. सेनेच्या आमदारात असंतोष धुमसत होता. त्याकडे दुर्लक्ष करून उद्धवजींनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कडे जास्त लक्ष दिले. त्यामुळेच आज ही परिस्थिती उद्भवली आहे.आम्हाला जनतेच्या डोक्यावर मध्यावधी निवडणुका लागायचा नव्हत्या. म्हणूनच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार आम्ही स्थापन करत आहोत. या संदर्भातील पत्र आम्ही राज्यपालांना सादर केले आहे.हिंदुत्वाची लढाई आहे हे तत्वाची लढाई आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाचे सरकार सत्तेवर येईल एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील असेही देवेंद्र फडणीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.
आज रात्री साडेसात वाजता केवळ एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी हाेईल. यानंतर चर्चा करुन मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta