Saturday , October 19 2024
Breaking News

विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर शिवसेनेचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादीही स्पर्धेत

Spread the love

मुंबई  : सत्तेतून बाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. याबाबात शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सभापतींना पत्र पाठवण्यात आले आहे. शिवसेनेशिवाय राष्ट्रवाद काँग्रेस आणि काँग्रेसही यासाठी स्पर्धेत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे 11 सदस्य आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 10-10 सदस्य आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती करुन विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करु शकतात.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऍड. अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी तसे विधान परिषद सभापतींना विरोधी पक्ष नेतेपदाच्या दाव्याचं पत्रही पाठवले आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे 11 तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 10 सदस्य आहेत. आता महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांना विरोधी पक्ष नेता करण्याच्या भूमिकेत आहे. तर काँग्रेसमध्ये मोहन कदम, राजेश राठोड, सतेज पाटील यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गेली विधानसभा निवडणूक लढली होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद पटकवण्यासाठी प्रसंगी दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षीय बलाबल काय?
78 सदस्यीय महाराष्ट्र विधानपरिषदेत भाजपचे 24 सदस्य आहेत. शिवसेनेचे 12 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी 10 – 10 सदस्य आहेत. लोक भारती, पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचा प्रत्येकी एक एक सदस्य आहे. तर चार अपक्ष सदस्य आहेत. 15 जागा खाली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

“प्रेयसी एक आठवण” या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित निघणार चित्रपट..

Spread the love  ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *