Tuesday , March 3 2026
Breaking News

संजय राऊतांना रात्री उशिरा अटक, आज कोर्टात हजर करणार

Spread the love

 

मुंबई : शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आलं.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *