Monday , December 8 2025
Breaking News

उदय सामंतांच्या गाडीवर शिवसेनेचा हल्ला, एक जण जखमी

Spread the love

 

पुणे : उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. कात्रज चौकात ठाकरे समर्थनकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर केला हल्ला आहे. पुण्याच्या कात्रज परिसररात ही घटना घडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदे हे पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांचा गाडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

उदय सामंतांच्या गाडीचा ताफा त्यांनी बघितला आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांचा गाडीवर दगडफेक केली आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुण्यातील कात्रज चौकात आदित्य ठाकरे यांची सभा होती. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. त्याचवेळी एकनाथ शिंदे देखील जवळच्या शंकर महाराज मठात होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दोघे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर आहेत. एका शहरात, एकाच दिवशी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना आमने-सामने येणार असल्याच्या चर्चेला उधाण आसे होते. त्यासोबतच शिवसेना नेते आदित्य ठाकरे देखील पुणे दौऱ्यावर आहेत. एका शहरात, एकाच दिवशी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना आमने-सामने येणार असल्याची शक्यता आहे. या ठिकाणी एकमेकांवर हल्लाबोल केला जाईल असं बोलण्यात येत होतं. मात्र त्यांच्याच ताफ्यातील माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Spread the love  मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *