मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास सव्वा महिन्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. ९ ऑगस्टला झालेल्या विस्ताराला दीड महिना उलटल्यानंतर अखेर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांचं वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकरांना मुंबई शहर, मंगलप्रभात लोढांना मुंबई उपनगर, शंभुराज देसाईंना ठाणे, संदिपान भुमरेंना औरंगाबादची जबाबदारी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूरसह सहा जिल्ह्यांची धुरा आहे. फडणवीसांना नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या अशा विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:
देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे- सांगली
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार- हिंगोली
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
भाजपकडे 21 जिल्हे
भाजपकडे 21 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्री आलेय. मुंबई उपनगर, जालना, बीड, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, धुळे, लातूर, नांदेड, नंदुरबार, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली
15 जिल्हे शिंदे गटाकडे
15 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदारी शिंदे गटाला मिळाली आहे. सातारा, ठाणे, मुंबई शहर, कोल्हापूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी, रायगड,औरंगाबाद, यवतमाळ, वाशिम, नाशिक, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे शिंदे गटाकडे आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta