Tuesday , March 3 2026
Breaking News

खाजगी बसला आग; 11 प्रवासी ठार

Spread the love

 

नाशिक : औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहनं तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *