मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे रात्री उशिरा निधन झालं. केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. सरफरोश, गांधी, वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.
सुनील शेंडे यांचं रात्री 1 वाजता विले पार्ले पूर्व इथल्या राहत्या घरी निधन झाले. आज दुपारी त्यांचे अंत्यविधी होणार आहेत. मुंबईतल्या पारशीवाडा इथल्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta