माणगांव (नरेश पाटील) : महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तसेच त्यांचा जन्मशताब्दी वर्ष निमित्त माणगांव शहर येथे मंगळवार दि. 01 मार्च 2022 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियान शासकीय मध्यवर्ती कार्यलयाच्या परिसरातून सकाळी ठिक 07:30 वाजता सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, राजीपचे माजी सभापती राजीवजी साबळे, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, न.पं.चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.
या मोहिमेत सुमारे दोन हजार सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. शहरातील एकूण 17 वॉर्डमध्ये आठ विभाग करून सुमारे 20 शासकीय कार्यालय तसेच आठ प्रमुख रस्ता येथे स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी ऐकून 35 ट्रॅक्टर व दोन जेसीबीचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणारे सर्व साहित्य जसे झाडू, पंजे, फावडे, कोयते, घमेला प्रतिष्ठानकडून पुरविण्यात आल्याची माहिती यावेळी आमच्या प्रतिनिधी देण्यात आली. मास्कही उपलब्ध करून देण्यात आले. स्वच्छता मोहिमेत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, झुडूपे, कचरा, काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या उचलून सदर कचरा डम्पिंग ग्राउंड जागेत नेऊन त्याची योग्य विल्हेवाट करण्यात आली.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …