कोल्हापूर- महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे अल्पशा आजाराने आज (दि.२) कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. कोल्हापुरात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पुत्र तुषार गांधी यांच्या संमतीने वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर, नंदवाळ रोड) येथील गांधी फौंउडेशनच्या जागेत सायंकाळी ०५ ते ६:३० या वेळेत अंत्यसंस्कार होणार आहेत.
अरुण गांधी हे भारतीय-अमेरिकन शांतता कार्यकर्ते, वक्ता आणि लेखक होते, जे त्यांच्या अहिंसा आणि सामाजिक न्यायाच्या वकिलीसाठी ओळखले जात. गेल्या दोन महिन्यांपासून अरुण गांधी त्यांच्या इच्छेनुसार अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्यास होते. अरुण गांधी यांचे पुत्र तुषार व त्यांचे नातेवाईक यांच्या संमतीने अरुण गांधी यांच्यावर वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर, नंदवाळ रोड, येथील गांधी फौंउडेशनच्या जागेत सायंकाळी ०५ ते ६:३० या वेळेत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांचे पुत्र तुषार गांधी कोल्हापुरला येण्यास निघाले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी दिली आहे
.
Belgaum Varta Belgaum Varta