Tuesday , March 3 2026
Breaking News

डॉ. नरेंद्रसिंह यांचे रायगड जिल्हा काँग्रेस चिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड

Spread the love


माणगांव (नरेश पाटील) : रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चिटणीसपद भूषविणारे दक्षिण रायगड जिल्ह्यातील नामांकित व्यक्तिमत्व डॉ. नरेंद्र सिंह यांची दुसऱ्यांदा चिटणीसपदी नुकतीच निवड झाली आहे.
डॉ. सिंह हे काँग्रेस पक्षातील जुने जाणते नेते आहेत तसेच त्यांनी दक्षिण रायगड येथे काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्याचबरोबर ते तत्कालीन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कै. माणिकराव जगताप यांचे अत्यंत जवळचे म्हणून परिचित होते. त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचे अनेकांकडून अभिनंदन होत आहे.
डॉ. नरेंद्रसिंह यांच्या निवडीचे पत्र दि. 07 मार्च 2022 रोजी राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने देण्यात आले. सदर पत्र शुक्रवारी दि. 11 मार्च रोजी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्याहस्ते डॉ. सिंह यांना प्रधान करण्यात आले.
यावेळी कोकणचे प्रभारी बी. एम. संदीप, जिल्हा काँग्रेस पदाधिकारी त्याचबरोबर माणगांव ता. काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *