Sunday , September 8 2024
Breaking News

संभाजी महाराजांचा खरा इतिहास उजेडात यावा : प्रा. गुलाब वाघमोडे यांचे प्रतिपादन

Spread the love

सासवडला शंभूराजे साहित्य संमेलन उत्साहात

सासवड : छत्रपती संभाजी महाराज यांनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले असून, इतिहासकारांनी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. शंभूराजांचां खरा इतिहास जनतेसमोर यावा. यासाठी छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनामुळे दडविलेला इतिहास उजेडात येण्यास मदत होईल, असे प्रतिपादन प्रा. गुलाब वाघमोडे यांनी केले.
सासवड येथे साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष श्री. वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनाचे उद्घाटन रावसाहेब पवार यांनी केले.
यावेळी माजी आमदार अशोकराव टेकावडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, भा. ल. ठानगे, सासवडचे माजी नगराध्यक्ष संजय अण्णा जगताप, प्रशांत वांढेकर, बाळासाहेब भिंताडे, सुनिता काकी कोलते, सोनाली यादव आदी उपस्थित होते.
संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी संमेलन आयोजित करण्यामागची भूमिका मांडली. साहित्य संमेलनाचे हे तेरावे वर्षे आहे. यावेळी, राजाभाऊ जगताप, प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, नंदकुमार दिवसे, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, अमोल बनकर, श्री. खेनट, अरविंद जगताप, प्रवीण कदम, प्रकाश धिंडले, सुषमा पाटील आदी उपस्थित होते.
श्री. वाघमोडे म्हणाले, दशरथ यादव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पासून सुरु झालेला साहित्याचा वारसा पुढे नेण्याचे भरीव काम केले. पत्रकार, कवी, लेखक, वक्ता, गीतकार, कथा, कादंबरी, इतिहास संशोधन या सगळ्या क्षेत्रात लीलया संचार केला आहे. आचार्य अत्रे, शाहीर सगभाऊ, होनाजी बाळा यांचा वारसा जतन केला आहे.
यावेळी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री संस्कृती बालगुडे, संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष अनंत चोंदे, शांताबाई गीत फेम संजय लोंढे, संतोष गायकवाड, शांताराम बापू कोलते, डॉ. गिरजा शिंदे, अर्चना पवार, नारायण गडाख, भरत निगडे, छगन यादव, शरद यादव यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वागताध्यक्ष दत्तात्रय कड, रावसाहेब पवार, निमंत्रक सुनील धिवार, गौरव कोलते यांनी मनोगत व्यक्त केले.

दरवर्षी जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी झाले होते. कऱ्हा नदीच्या काठावर साहित्य संमेलनात परिसंवाद झाला. प्रा. उध्दव लवाटे, योगेश्री कोकरे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. आभार शामराव मेमाणे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी

Spread the love  सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्यानंतर गायब असलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *