Monday , December 8 2025
Breaking News

15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही आक्षेप; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

Spread the love

 

पुणे : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही भाष्य केले. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती, असे संभाजी भिडे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील दिघी येथे रविवारी (25 जून) संभाजी भिडेंच्या जाहीर व्याख्यान होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने आयोजन केले होते. यामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायंच नमस्कार नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असे भिडे म्हणाले.

संभाजी भिडेंचा राष्ट्रगीतावर आक्षेप का?

रवींद्रनाथ टागोरांनी 1911 मध्ये केली ‘जन गण मन’ची रचना

टागोरांनी रचलेल्या गीतात पाच कडवी, राष्ट्रगीत म्हणून एकच कडवं स्वीकारलं

जन गण मन 1911 मध्ये भारतात भरलेल्या दिल्ली दरबारसाठी रचल्याचा आरोप

हे गीत दिल्लीत भरलेल्या दरबारात ब्रिटन सम्राट जॉर्ज पंचमला

भारत सम्राट जाहीर केलं जातं होतं त्यासाठी रचलेल्याचा आरोप

टागोरांनी मात्र एका पत्रातून तेव्हा हे सर्व आरोप नाकारलेले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Spread the love  मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *