सोलापूर : आज आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस यावेत. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा. पाऊस पडू दे, प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी घातलं. सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पुजेचा मान मला मिळाला, त्यामुळं मी स्वता:ला भाग्यवान समजतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत, बळीराजा ला तांगले दिवस यावेत असं मागणं विठुरायाच्या चरणी मुख्यमंत्र्यांनी केलं. जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे तो असाच पुढे नेण्याचे बळ मला मिळावे एवढीच इच्छा मनोमन त्याच्याकडे व्यक्त केली. राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले. तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई आणि घर भत्ता मंजूर करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
सलग दुसऱ्या वर्षी पुजेचा मान, मी स्वत:ला भाग्यवान समजतो
आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखुमाईची विधीवत शासकीय महापूजा करण्याचे भाग्य मला मिळाले. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्याची मनोभावे आराधना करण्याची संधी मला मिळाली, मी भाग्यवान समजतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
संपूर्ण पंढरपूर आज वारकरीमय झालं आहे
आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाची शासकीय पुजा करण्याचं भाग्य मला मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपुरात येतात. संपूर्ण पंढरपूर आज वारकरीमय झालं आहे. सगळं वातावरण मंगलमय झालं आहे. बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरची सगळी संकट दूर होऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ देत हेच मागणं विठ्ठलाच्या चरणी मागितल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सर्व प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. सर्वांनी सहकार्य केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta