Wednesday , December 10 2025
Breaking News

बुलढाण्यात दोन बसेसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, तर 21 जखमी

Spread the love

 

मलकापूर : मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज पहाटे ( 29 जुलै) तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली.

दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्यानं अपघात
मिळालेल्या माहितीनुसार एम एच 08. 9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तातडीनं मदत कार्य सुरू केले आहे.

जखमींची प्रकृती चिंताजनक
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळं पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, ग्रामीण पो.नी. एफ.सी. मिर्झा यांनी भेट दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *