Sunday , July 26 2026
Breaking News

गारगोटी-पाटगाव मार्गावर कार ओढ्यात कोसळून २ तरुण ठार

Spread the love

 

गारगोटी : गारगोटी – पाटगाव राज्य मार्गावर भरधाव चारचाकी गाडी अनफ खुर्द -दासेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरून कोसळून दोन तरूण ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.28) सकाळी घडली. आदिल कासम शेख (वय- 19), जहीर जावेद शेख (वय-19) अशी मृतांची नावे असून साहिल मुबारक शेख (वय- 20) हा जखमी झाला आहे. (सर्वजण रा. अनफ खुर्द, ता. भुदरगड) येथील रहिवासी होते. या अपघाताची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे. या घटनेमुळे अनफ खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आदिल शेख (एमएच 12 केजे- 6550) या कारने दोन मित्रांसह आज सकाळी 11.30 च्या दरम्यान कोल्हापूरला निघाला होता. भरधाव गाडीवरील त्याचा ताबा सुटल्याने अनफ खुर्द – दासेवाडी ओढ्यात गाडी कोसळली. या अपघातात जहीर शेख जागीच ठार झाला. तर आदिल शेख यास उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. जखमी साहिल शेख याच्यावर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आदिल शेख हा एकुलता एक असून तो हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. तर त्याचे वडील नोकरी निमित्त बाहेरगावी आहेत. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व पोलीस कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन जखमीला उपचारासाठी दाखल केले.

About Belgaum Varta

Check Also

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Spread the love  आपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना कोल्हापूर : संभाव्य पूरस्थितीला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *