Friday , November 22 2024
Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं!

Spread the love

 

मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी ते आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत अहोरात्र लढा दिलेल्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी बाजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (27 जानेवारी) वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचत मनोज जरांगे यांना सरकारकडून काढण्यात आलेला जीआर (शासकीय अध्यादेश) सुपूर्द केला. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची गळाभेट घेत पाठ थोपटली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.

मनोज जरागेंनी इशारा देताच रात्रीत अध्यादेश
मागण्यांवर आज रात्रीपर्यंत बाबतीत आदेश काढावा. अन्यथा, आज (27 जानेवारी) दुपारी बारानंतर आझाद मैदानाकडे कूच करू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलकांचा ताफा वाशी, नवी मुंबईत या ठिकाणी थांबला होता. अध्यादेश मिळाला तरी आझाद मैदानाकडे गुलाल उधळण्यासाठी जाणार आणि नाही मिळाल्यास त्याठिकाणीच उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, त्यांनी अध्यादेश मध्यरात्री काढल्यानंतर आझाद मैदानाकडील प्रवास थांबवला आणि आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

सगेसोयऱ्यांवर सरकारकडून एक पाऊल मागे
सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठ्यांना आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने पूर्ण झाला असून 54 लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या वेशीवर वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मनोज जरांगे पाटील यांनी काल (26 जानेवारी) 13 मागण्या करत राज्य सरकारला आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यामध्ये अत्यंत काथ्याकूट झालेल्या सगेसोयरे हा कळीचा मुद्दा होता. या मुद्यावरून सरकारने एक माघार घेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्या मान्य करत राज्य सरकारने जीआर मध्यरात्रीच काढण्यात आला. सोबतच नोंदी सापडलेल्यांच्या सगसोयऱ्यांनाही लाभ होणार असल्याने जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठ्यांनी अनेकांना मोठं केलं, मोठमोठी पदं अनेकांना मिळाली. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना, संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. सरकारने जे निर्णय घेतले त्यामध्ये, कुणबी प्रमाणपत्र देण्याचं शिंदे समितीला मुदतवाढ, प्रमाणपत्र देण्याचं शिबीर घेण्यासाठी अधिसूचना, नोंदी शोधण्यासाठी समिती, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर कायद्याच्या चौकटीत टिकणारं, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, असं मराठा आरक्षण ज्या ओबीसींना सवलती मिळतात, त्या सवलती मराठ्यांना दिल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आपला त्यांना विरोध संपला आहे. आपली मागणी मान्य झाली आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांना आपण विरोध होता. समाज म्हणून आपला विषय संपला आहे. मी मुख्यमंत्री यांच्या हस्ते जूस स्वीकारणार आहे. आपण त्यांच्या हस्ते पत्र स्वीकारणार आहोत. समाजाला मी मायबाप मानले आहे. मी तुम्हाला विचारून निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना बोलवू का? यावर सर्वांनी होकार दिल्याने मी निर्णय घेतला आहे.सर्व खुट्या मी उपटल्या आहेत. मला विजयी सभा प्रचंड मोठी घ्यायची आहे. ती तारीख लवकर घोषित करणार, असल्याचे जरांगे म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *