Friday , November 22 2024
Breaking News

पाणीदार आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन

Spread the love

 

सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन झालेय. वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.

शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते. ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर चार वेळा आमदार झालेत. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो.

दरम्यान, गेल्यावर्षी अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झाले होते. सहा महिन्यानंतर अनिल बाबर यांचंही निधन झालेय. वर्षाच्या आत बाबर कुटुंबातील महत्वाच्या दोन सदस्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *