Wednesday , April 22 2026
Breaking News

घटस्फोटित पत्नी व प्रियकराचा नराधमाकडून खून

Spread the love

 

अथणी : लग्नाच्या काही दिवसांनी पत्नीला घटस्फोट दिलेल्या पत्नीचा व तीच्या प्रियकराचा एका नराधमाने खून केला. सदर घटना अथणी तालुक्यात घडली आहे.

ही घटना अथणी तालुक्यातील कोकतनूर येथील यल्लम्मवाडी सावलगी रोडजवळ घडली आहे. येथील याशीन (21) आणि हीना (19) यांची हत्या करण्यात आली. तौफिक (28) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. खून झालेले दोघेही यल्लम्मवाडी, कोकतनूर येथील रहिवासी आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी तौफिकने हीनाशी लग्न केले होते. मात्र यासीनसोबतचे तिचे अवैध संबंध समजल्यानंतर त्याने तिला घटस्फोट दिला.
नंतर हिना आणि यासीन एकत्र राहत होते. तौफिकच्या घराजवळच तो राहत होता असे समजते. मंगळवारी सायंकाळी तौफिकने दोघांची हत्या केली असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *