

माणगांव (नरेश पाटील) : प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजना ही सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढ 26 मार्च रोजी करण्यात आली आहे. सदर योजना एप्रिल 2020 पासून कोविड काळात चालू करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत टप्प्याटप्प्याने वाढविली ती आता सप्टेंबर 2022 पर्यंत वाढ केली आहे. या योजनेचा लाभ देशातील 80 कोटी लाभार्थींना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला नियमित मिळणाऱ्या धान्य सोबत अतिरिक्त पाच किलो गहू व पाच किलो तांदूळ असे मोफत धान्य मिळणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta